अकोला: उत्पादन करणारे शेतकरी, खरेदी करणारेही शेतकरीच, त्यामुळे या दोघांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजला व्यावसायिक दृष्टिकोन ठरवावा लागतो. त्यासाठी नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या सदस्यांच्या आमसभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी खासदार, महाबीजचे संचालक अॅड. खासदार संजय धोत्रे, संचालक वल्लभराव देशमुख, शेतकरी तज्ज्ञ संचालक अर्चना चोरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, भागधारक आमदार रणधीर सावरकर, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, कृषी विद्यापीठाचे डॉ. खर्चे, महाबीजचे पुंडकर उपस्थित होते.पुढे बोलताना डवले यांनी शासन निर्मित महाबीज ही संस्था बाजारातील स्पर्धेला तोंड देऊनही नफ्यात आहे. त्याचवेळी इतर संस्था तोट्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे, महाबीजने सुरुवातीपासूनच अंगीकारलेला शेतकरी विकासाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधान त्यांनी केले. त्यामध्ये गेल्या वर्षी बियाणे उत्पादकांना किमान आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम देण्याचा विचार निश्चित केला जाईल. बियाणे नमुने फेल होण्याच्या पद्धतीत सुधारणा केली जाईल. त्यासाठी नमूने घेण्याची पद्धत नव्याने ठरवली जाईल. उत्पादकांना मोबदला तातडीने मिळण्यासाठी व्यवस्थेत बदल करण्यासाठी संगणकीकरण करणे, आपत्तीमध्ये बियाणे उत्पादकांना भरपाई मिळण्यासाठी पीक विम्याच्या पर्यायाची तयारी ठेवणे, उत्पादकांना सर्वच प्रक्रियेबाबत मेसेंजिंग प्रणाली विकसित केली जाईल. महाबीजच्या प्रत्येक प्लँटवर सीसी कॅमेरे तातडीने लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी संचालक देशमुख यांनी शेतकºयांच्या मागण्या, अपेक्षांवर निर्णय घेण्याची मागणी केली. व्यवस्थापकीय संचालक भंडारी यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली.
काळानुसार बदला- धोत्रेमहाबीजचा विक्रेता आणि ग्राहक एकच शेतकरी आहे. त्यामुळे महाबीजच्या सुरुवातीपासूनच यंत्रणा आणि शेतकºयांचे जिव्हाळ््याचे नाते होते. ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. काळानुसार बदल झाला तरी माणूस म्हणून एकमेकांशी समन्वय हवा, अधिकारी-कर्मचाºयांनी तो आताही ठेवायलाच हवा. समस्या छोटी असतानाच दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होते, याकडे खासदार तथा संचालक अॅड. खासदार संजय धोत्रे यांनी लक्ष वेधले.