अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश; प्रक्रिया सुरू
अकोला : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येतो, या योजनेअंतर्गत प्रवेश सुरू झाले असून, दि. १० फेब्रुवारी २०२१पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळी प्रादुर्भाव नियंत्रण
अकोला : हरभऱ्याचे पीक हे सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणत: आठ ते दहा दिवसांनतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल या दरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. त्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकशास्त्र विभागातून नियंत्रण उपाययोजना व सूचना देण्यात आल्या आहेत.
ऑफिसर क्लब येथे रक्तदान शिबिर
अकोला : जिल्ह्यातील गरजू रुग्णाला सहजपणे रक्त पुरवठा व्हावा व भविष्यात रक्त तुटवडा भासणार नाही यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले सामाजिक दातृत्व समजून रक्त दानाकरिता पुढे येणे आवश्यक आहे. ऑफिसर्स क्लब व्यवस्थापन समितीद्वारे बुधवारी (दि.२३) रोजी सकाळी ११ वाजता ऑफिसर्स क्लब, अकोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरास सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.