---------------------
अकोट: गणगणे विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षेत सुयश
अकोटः केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या एन.एम.एम.एस. (नॅशनल मिन्स कम मेरीट स्काॅलरशिप) परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, या परीक्षेत स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. मोनिका गजानन धुळे, श्रावणी रवींद्र वायकर, निखिल ज्ञानदेव बोडखे, ऋत्विक विजय गुजर, अंगद विनोद फुंडकर, सीता वासुदेव दामधर, वेदांत मुकुंद अंबळकार, ओम राजेश मुऱ्हेकार या आठही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. नियमित अभ्यास, संभाव्य प्रश्नांचा भरपूर सराव व शाळेत मिळालेले अचूक मार्गदर्शन या बळावरच आपण यशस्वी झालो असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. रेखाताई जुनगरे, प्रभारी शिक्षक उद्धव गणगणे, मार्गदर्शक सचितानंद जुनगरे, प्रकाश किरडे आदींसह आई-वडिलांना दिले आहे. याबद्दल संस्थेच्या सचिव सुमंगला गणगणे, संचालक गजानन गणगणे, अर्चना गणगणे, विशाल गणगणे आदींनी समाधान व्यक्त केले. (फोटो)