फोटो:
चंद्राई व्यसनमुक्ती केंद्रातर्फे महामानवास अभिवादन
मूर्तिजापूर : चंद्राई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, सिरसो येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पित करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष विनोद बावनेर उपस्थित होते. संस्था सचिव छाया बावनेर उपस्थित होते. संस्थेचे प्रकल्प संचालक अपर्णा बोधलकर यांनी राजा संविधानाचा विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेतील समुपदेशक विजय प्रभे, पद्मा थोरात, गावातील मंडळी उपस्थित होते.
जयाजी महाराज विद्यालयात अभिवादन
मूर्तिजापूर: जयाजी महाराज विद्यालय, अनंतराव देशमुख कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय कनिष्ठ महाविद्यालय हिरपूर येथे भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डी. एस. ननीर यांचे अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जे. एन. माळवे, पर्यवेक्षक तथा माजी प्राचार्य ही. पी. बुरघाटे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
शिक्षक बुरघाटे, माळवे, प्राचार्य डी. एस. ननीर यांनी बाबासाहेबांनी केलेल्या उदात्त कार्याचे देश आणि समाज हिताचे प्रसंग सांगितले. संचालन जी. आर. ढोकणे यांनी केले.
बाबा ब्रिगेडतर्फे रक्तदान शिबिर
मूर्तिजापूर : भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंंबर रोजी बाबा ब्रिगेड संघटनेतर्फे रेल्वे कॉलनी बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबा ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करण वानखडे, उपाध्यक्ष पप्पू दामोदर, शिक्षक संघटनेचे सरसंघनायक गवई, सुनील तायडे, भावेश वानखडे, आकाश समधुर, अंकज दाभाडे, अनिकेत खिराडे, अनिकेत खंडोबल्लाळ, संकेत सिरसाट, प्रशांत भटकर, राहुल इंगले, दिनेश भोजने, शुभम समधुरे, रोशन तायडे, रोहित अंभोरे उपस्थित होते. शिबिरात १४४ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.