अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असून, निवडणूक रिंगणातील ६८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सीलबंद ’ झाले आहे. गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भवितव्याचा ‘फैसला ’ होणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ७०३ मतदान केंद्रांवर २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि अपक्षांसह ६८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्टॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम ) सीलबंद झाले आहे. गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, मतमोजणीअंती जाहीर होणाºया निवडणूक निकालात निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.मतदारसंघनिहाय असे आहेत उमेदवार!मतदारसंघ उमेदवारअकोट १७बाळापूर १५अकोला पश्चिम ०९अकोला पूर्व १३मूर्तिजापूर १४............................................एकूण ६८कोण-कोण मारणार बाजी; मतदारांची उत्कंठा शिगेला !विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान घेण्यात आले असून, त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सीलबंद ’ झाले. २४ आॅक्टोबर रोजी होणाºया मतमोजणीत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कोण-कोण बाजी मारणार, याबाबत आता उमेदवारांच्या समर्थकांसह मतदारसंघांमधील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.