अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघात १४ आॅक्टोबरपर्यंत निवडणूक खर्च करणाºया उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च भाजपा उमेदवाराचा आहे. त्यामुळे मतदारसंघात निवडणूक खर्च करण्यात भाजपा सर्वात पुढे असून, दुसºया क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक खर्च आहे.अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यापैकी १२ उमेदवारांकडून १४ आॅक्टोबरपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची माहिती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या खर्चविषयक पथकाकडे सादर करण्यात आली. त्यानुसार भाजपाचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांचा सर्वाधिक म्हणजेच ५ लाख ९५ हजार ५५९ रुपये निवडणूक खर्च असून, दुसºया क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार हरिदास भदे यांचा निवडणूक खर्च ५ लाख ७५ हजार ७५० रुपये आहे. तिसºया क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार विवेक पारसकर यांचा निवडणूक खर्च ४ लाख ९७ हजार १४६ रुपये आहे.१४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांचा असा आहे निवडणूक खर्च!रणधीर सावरकर (भाजपा) ५ लाख ९५ हजार ५५९ रुपये, हरिदास भदे (वंचित बहुजन आघाडी) ५ लाख ७५ हजार ७५० रुपये, विवेक पारसकर (काँग्रेस) ४ लाख ९७ हजार १४७ रुपये, शेषराव खडसे (बसपा) १७ हजार २१५ रुपये, प्रीती सदांशिव (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया-सोशल) ३३ हजार ३१४ रुपये, निखिल भोंडे (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया-डेमोकॅ्रटिक) ६ हजार ३५० रुपये, प्रफुल्ल ऊर्फ प्रशांत भारसाकळ. (संभाजी ब्रिगेड पार्टी) १३ हजार ६३८ रुपये, हर्षल सिरसाट (बहुजन मुक्ती पार्टी) १४ हजार ४८० रुपये, अजाबराव ताले (अपक्ष) ८० हजार १२० रुपये, अनिल कपले (अपक्ष) ३४ हजार ५३४ रुपये, अशोक कोलटके (अपक्ष) १२ हजार १०० रुपये, महेंद्र भोजने (अपक्ष) यांचा २९ हजार १८० रुपये निवडणूक खर्च आहे.खर्च सादर केला नाही; अपक्ष उमेदवारास ‘शो-कॉज’!अकोला पूर्व मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय आठवले यांनी १४ आॅक्टोबरपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची माहिती सादर केली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यामार्फत त्यांना दोनदा कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजाविण्यात आली आहे.