लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेतून बुधवारी भरदिवसा पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे, बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांना सायंकाळपर्यंत बँकेतून पाच लाख चोरी गेल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान लक्षात आले.गांधी रोडवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे बँकेच्या कामात व्यस्त होते. काही वेळातच बँकेच्या इतर ग्राहकांसोबतच तीन व्यक्तीदेखील बँकेत पोहोचले. या तिघांनी बँकेतील कर्मचार्यांच्या काउंटरवर भेट देऊन कर्मचार्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी व अधिकारी व्यस्त असल्याचे निदर्शनास येताच त्यांचाच साथीदार असलेला चौथा व्यक्ती बँकेच्या आतमध्ये आला. त्याने थेट रोकड विभागात प्रवेश केला. रोकड विभागातील पाच लाख रुपयांची रोकड बॅगेत टाकू न पळ काढला. महाराष्ट्र बँकेच्या रोकड विभागात जाऊन त्यामधील पाच लाख रुपयांची रोकड घेऊन एक चोर सर्वांचे लक्ष चुकवून निघून गेल्याने एकाही बँक अधिकारी व कर्मचार्याच्या लक्षात न आल्याने पोलीसही अवाक् झाले आहेत. बुधवारी सायंकाळी बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर कॅश विभागाचे कर्मचारी नियमाप्रमाणे रोकड मोजत असताना यामध्ये तब्बल पाच लाख रुपये कमी असल्याचे दिसून आले. बँकेच्या व्यवस्थापकाने तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना या चोरीची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेत भरदिवसा चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असता तपासामध्ये बॅँक अधिकारी व कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे हा चोरीचा प्रकार घडल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी सांगितले की, भरदिवसा गांधी रोडवरील वर्दळीच्या महाराष्ट्र बँकेत चोरी होणे, हा प्रकार बँक कर्मचारी व अधिकार्यांचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत आहे. सीसी कॅमेर्याच्या फुटेजमध्ये चोरट्याचा हा प्रकार कैद झाला आहे.
सीसी क ॅमेर्यामध्ये चोर कैदबँकेमध्ये शिरून रोकड विभागात प्रवेश करून पाच लाखांची रोकड पळविणारा चोरटा अधिकारी व कर्मचार्यांच्या नजरेतून सुटला; मात्र तो सीसी कॅमेर्याच्या फुटजेमध्ये स्पष्ट दिसला आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सीसी कॅमेर्याचे फुटेज तपासताच या चोरट्याचा चेहरा समोर आला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.