अकोला : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा घेऊन अकोल्यात आले होते. त्या यात्रेच्या पूर्वसंध्येला सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आपल्या समस्येकडे लक्ष वेधले; मात्र या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.
निवडणुकीचा प्रचार करून ते निघून गेले. तुमचे मुख्यमंत्री असंवेदनशील असून, भाजपचे सरकार मग ते केंद्राचे असो की राज्यातील ते तरुणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे, अशी टीका किसान क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली. काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’च्यावतीने ४ सप्टेंबर रोजी स्वराज्य भवन येथून बेरोजगार यात्रा काढण्यात आली. या यात्रेदरम्यान पटेल यांनी युवकांशी संवाद साधला.