शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

Maharashtra Election 2019 : जाहीर सभेत प्लास्टीकचा वापर; राष्ट्रवादीला दहा हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 1:21 AM

पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला होता.

मूर्तिजापूर (अकोला) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर प्रचार सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ९ आॅक्टोबर रोजी दुपारी शरद पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. जमलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती; पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला होता. सभा संपल्यानंतर प्रांगणात प्लास्टिक ग्लासचा मोठा खच साचला होता. या सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असल्याने स्थानिक नगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर १० आॅक्टोबर रोजी १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ज्या व्यापाऱ्याने अथवा दुकानदाराने या प्लास्टिक ग्लॉसचा संबंधित सभेसाठी पुरवठा केला आहे, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.

टॅग्स :murtizapur-acमूर्तिजापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019