अकोला : विद्युत सुरक्षिततेचे नियम सर्वांना माहीत असले तरी, सातत्याने प्रबोधन करून ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. विद्युत सुरक्षितता ही फक्त सप्ताहापुरती न राहता नेहमीच नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांनी केले. ते विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महावितरणच्या वतीने विद्युत भवनातील आवारात बुधवारी आयोजित जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलत होते.घरगुती व सार्वजनिक यंत्रणेच्या विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्याकरीता ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत विद्युत नियमांचे पालन व्हावे तसेच घरगुती व सार्वजनिक वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून महावितरणच्या वतीने सप्ताहाचा समारोप १७ जानेवारी रोजी विद्युत सुरक्षा जनजागरण रॅलीने करण्यात आला. यावेळी विद्युत भवन येथून सदर रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
अकोल्यात महावितरणकडून सुरक्षा उपायांचा जागर; रॅलीने झाला विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 4:05 PM
अकोला : विद्युत सुरक्षिततेचे नियम सर्वांना माहीत असले तरी, सातत्याने प्रबोधन करून ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. विद्युत सुरक्षितता ही फक्त सप्ताहापुरती न राहता नेहमीच नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांनी केले.
ठळक मुद्देविद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्याकरीता ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.समारोप सोहळ्यानिमित्त विद्युत भवन येथून सुरु झालेल्या रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.सिविल लाईन चौक, पोस्ट आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, सिटी कोतवाली, टिळक रोड, अग्रसेन चौक या मागार्ने जनजागरण करीत विद्युत भवन येथे समारोप झाला.