शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

महावितरण म्हणते, भारनियमन तात्पुरते!

By admin | Published: May 07, 2017 1:37 PM

भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

परिस्थितीनुसार नियोजन : लवकरच भारनियमन बंद होण्याचा आशावादअकोला: मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात साधारणपणे १५00 मेगावॉट भारनिमयन सुरू असून, महावितरणकडून विजेचा दररोजचा मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हे भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.विजेच्याबाबत परिस्थितीनुसार नियोजन करावे लागते. महावितरणने सर्व स्रोतांकडून उपलब्ध असलेली वीज व मागणी यांचा ताळमेळ घातला होता. कोळशावर आधारित संच बंद पडणे, कोळसा कमी उपलब्ध होणे आणि अचानक तांत्रिक कारणांमुळे वीज संच बंद पडणे या तीन कारणांमुळे विजेच्या उलब्धतेत ३ हजार मेगावॉटची कमतरता निर्माण झाली. पवन ऊर्जेतही मागच्या वषीर्पेक्षा यावर्षी ५00 मेगावॉटची कमतरता आहे.तापमानातील बदलामुळे एकूण २ हजार मेगावॉटने विजेची मागणी वाढली आणि अंदाजे २ हजार ५00 मेगावॉट विजेची उपलब्धता कमी झाली. असे असूनही मागील ३ दिवसांपासून केवळ १ हजार ५00 मेगावॉटपर्यंतच र्मयादेत भारनियमन करण्यात येत आहे.कोळशाच्या पुरवठय़ामध्ये वाढ करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेस्टर्न कोलफिल्ड लि. व साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये प्रयत्न सुरू आहेत. मा. ऊर्जामंत्री महोदयांनी स्वत: या प्रकरणांमध्ये लक्ष घातले असून, केंद्रीय कोळसा मंत्री यांना कोळसा उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार कोळशाच्या पुरवठय़ात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले काही संच सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेले प्रयत्न व इतर स्रोतांमधून विजेची उपलब्धता वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदर भारनियमन पुढील चार-पाच दिवसांत बंद होईल. शासनस्तर किंवा ऊर्जा मंत्रालयाच्या स्तरावर विजेच्या नियोजनाचे काम केले जात नाही तर महावितरणकडूनच विजेच्या नियोजनचे काम केले जाते. वरील सर्व बाबी लक्षात घेता विजेच्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नसून, सदर स्थिती ही अचानक उद्भवलेल्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे.