- अतुल जयस्वाल
अकोला : माहिती तंत्रज्ञान युगात कुठल्याही कंपनीचे व व्यवसायाचे संकेतस्थळ हे त्या व्यवसायाचा आत्मा असते. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीची वाटचाल ‘डिजिटल’कडे सुरु आहे. या वाटचालीत आणखी एक पाऊल टाकत महावितरणने आपल्या संकेतस्थळात बदल करून, ते आणखी ग्राहकाभिमूख करण्याचा प्रयत्न केला आहे. हे संकेतस्थळ अधिक आकर्षक व ग्राहकांसाठी सोयीचे असून, यामध्ये अनेक ग्राहकपयोगी माहिती सहज उपलब्ध करण्यात आली आहे.
‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन’ हा महावितरणच्या संकेतस्थळाचा पत्ता असून, सदर संकेतस्थळ उघडल्यानंतर दिसणारा लूक ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना भावणारा आहे. सुरुवातीला स्लाईड शो मध्ये चालणारे फोटो महावितरणच्या कामाची पावती देत आहेत. कुठलीही माहिती शोधण्यासाठी आता जास्त वेळ खर्ची घालण्याची गरज नाही. महावितरणचे संकेतकेतस्थळ मोबाईल, टॅबलेट या उपकरणावरही सहजपणे हाताळता येते. केंद्रसरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. सुरुवातीला स्क्रीनवर उजव्याबाजूला टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत. तर त्याखाली विविध लिंक स्लाईड शो च्या वर दिलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महावितरणच्या नव-नवीन सेवांची माहिती सुरुवातीला स्क्रीन उघडताच दृष्टीस पडते. ग्राहक सेवेची निवड केल्यास नवीन वीज जोडणी अर्ज, प्रिपेड मिटर रिचार्ज, आॅनलाइन तक्रार नोंदणी व आॅनलाइन विज देयके पाहण्यासाठी व भरण्यासाठी पर्याय दिले आहेत. यासोबतच नागरिकांची सनद, वीजपुरवठ्यासंबंधी आयोगाने ठरवून दिलेली कृतीची मानके, तक्रार निवारण, विविध परिपत्रके व माहिती उपलब्ध आहे. विविध सेवांबद्दलचा अभिप्रायह या नव्या संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे.बील भरण्यासाठी थेट लिंकग्राहकांसाठीच्या सर्व सवो ‘कंझ्यूमर पोर्टल’ मध्ये असून, स्क्रीन च्या डाव्या बाजूला ‘ क्विक बिल पेमेंट’‘ या लिंक मध्ये फक्त ग्राहक क्रमांक टाकुन ‘आय अॅग्री’ या ‘कंडीशन’ वर क्लीक करून ‘पे नाऊ’ या बटन वर क्लीक केल्यास बिलिंग युनिट न टाकता नुसता ग्राहक क्रमांक टाकला की लगेच माहिती दृष्टीस पडते आणि वीज भरणा पद्धती निवडून देयकाचा भरणा करता येतो.ग्राहक, कंत्राटदार, कर्मचाºयांसाठी स्वतंत्र वेबपेजेसनव्या संकेतस्थळात कर्मचारी आणि ठेकेदार या घटकांसाठी स्वतंत्र वेब पेज तयार करण्यात आले आहेत. ग्राहकांसाठीच्या सर्व सेवा ‘कंझ्यूमर पोर्टल’मध्ये दिसतात. कंत्राटदारांसाठी ‘सप्लायर्स पोर्टल’ आणि कर्मचाºयांसाठी ‘एम्प्लॉयी पोर्टल’ अशी स्वतंत्र व्यवस्था आहे.जुने संकेतस्थळ ३० जूनपर्यंत उपलब्धमहावितरणचे जुन्या संकेतस्थळाची लिंकही या नव्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या ग्राहकाला जुन्या संकेतस्थळाला भेट द्यायची असेल, तर ही सुविधा आहे. तथापी, जुने संकेतस्थळ फक्त ३० जूनपर्यंत उपलब्ध असणार आहे.