- संतोष येलकर
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या निकालात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ८० मतदारसंघांपैकी ५१ मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुती विजयी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ५१ जागांवर ‘महायुती’ने बाजी मारली आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाले. या निवडणूक निकालात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, जालना, बीड, परभणी व लातूर इत्यादी शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ८० विधानसभा मतदारसंघांपैकी ५१ मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील विधानसभेच्या ५१ जागांवर बाजी मारल्याने, या जिल्ह्यांतील शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे.१४ जिल्ह्यांत ‘महायुती’ने अशा प्राप्त केल्या जागा!शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीने विधानसभेच्या ५१ जागा प्राप्त केल्या. त्यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ५ पैकी ५, अमरावती जिल्ह्यात ८ पैकी १, बुलडाणा जिल्ह्यात ७ पैकी ५,वाशिम जिल्ह्यात ३ पैकी २, वर्धा जिल्ह्यात ४ पैकी ३ जागा महायुतीने प्राप्त केल्या, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ९ पैकी ९, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ पैकी ४, नांदेड जिल्ह्यात ९ पैकी ४, हिंगोली जिल्ह्यात ३ पैकी २, जालना जिल्ह्यात ५ पैकी ३, बीड जिल्ह्यात ६ पैकी २, परभणी जिल्ह्यात ४ पैकी ३ व लातूर जिल्ह्यात ६ पैकी २ जागांवर महायुतीने विजय मिळविला.विधानसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ८० जागांपैकी ५१ जागांवर भाजपा-शिवसेना महायुतीने विजय प्राप्त केला. त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकरी व ग्रामीण जनतेच्या मताचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.-किशोर तिवारीअध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन.