अकोला : राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीची चर्चा अपूर्ण असतानाच, काँग्रेसने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीने अकोला जिल्ह्यातील दिग्गज इच्छुक उमेदवारांची झोप उडवली. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या अकोला जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी आकोटमधून युवक काँग्रेसचे महेश सुधाकर गणगणे यांना, तर बाळापूरमधून माजी आमदार सैयद नातिकोद्दिन ख ितब यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.पक्षांच्या उमेदवार यादीकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागून असताना, बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसने ११८ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानुसार माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी महेश गणगणे यांना आकोट मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली असून, बाळापूरमधून माजी आमदार सै. नतिकोद्दीन खतिब यांना काँग्रेसने संधी दिली आहे. महेश गणगणे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. खतीब हे या पूर्वी विधानपरिषदेवर नामनिर्देशित झाले होते. अकोला जिल्ह्यातून बाळापूर किंवा अकोला पश्चिम मतदारसंघातून अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्त्व दिले जाण्याची शक्यता वर्तविली होती. बाळा पूरमधून खतीब यांना उमेदवारी मिळाल्याने अकोला पश्चिमची उमेदवारी माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र डॉ. झिशान यांना मिळण्याची शक्यता मावळली आहे. या मतदारसंघासाठी नगरसेविका उषा विरक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली असली तरी, यासंदर्भात पक्षातर्फे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेस नेते मुकुल वासनिक गुरूवारी सकाळी शिवणी विमानतळावर येणार असून, ते उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली.शिवसेनेच्या पहिल्या यादीत गोपीकिसन बाजोरियांना स्थान?अकोला पूर्व मतदारसंघातून आमदार गोपीकिसन बाजोरिया यांचे नाव समाविष्ट असल्याची माहिती शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीत अकोला पूर्व मतदारसंघातून आमदार गोपीकिसन बाजोरिया यांचे नाव समाविष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था म तदारसंघातून निवडून आलेले बाजोरिया यांना प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उ तरविण्याची तयारी शिवसेनेने केली असल्याने अकोला पूर्व मतदारसंघावर लक्ष ठेवून असलेल्या शिवसेनेच्या इतर दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. शिवसेनेची यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. बुधवारी मातोश्रीवर गुलाबराव गावंडे आणि श्रीरंग पिंजरकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा प्रकारही बाजोरिया यांची उमेदवारी पक्षाने निश्चित केली असावी, असेच संकेत देतो. या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला दिली जाते, यावर या मतदारसंघाचे चित्र अवलंबून राहणार आहे.
आकोट विधानसभेसाठी महेश गणगणे तर बाळापूरातून खतीब
By admin | Published: September 25, 2014 3:05 AM