अकोला, दि. ३0: राष्ट्रीय क्रीडा दिनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसंत देसाई क्रीडांगणावर पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत अकोला फायटर्सने प्रभुत्व गाजवून मेजर ध्यानचंद बॉक्सिंग चषक पटकावला. अकोला महानगर बॉक्सिंग संघटना व अकोला क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तेलंगाणा टायगर्सचे खेळाडू सहभागी झाले होते. अकोला आणि तेलंगाणा यांच्यात झालेली चुरशीची लढत पाहण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात आर्क डान्स अकॅदमीच्या चमूने बहारदार नृत्य सादर केले. यावेळी अकोला फायटर्सच्या विजयी १६ खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके व मेजर ध्यानचंद चषक प्रदान करण्यात आला. द्वितीय स्थान मिळविणार्या तेलंगाणा टायगर्सच्या १0 खेळाडूंनासुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ह्यबेस्ट बॉक्सर ऑफ द चॅम्पियनशिपह्णचा खिताब अकोला फायर्टचा राष्ट्रीय विजेता अजय पेंदोरू याला देण्यात आला. तर बेस्ट चॅलेंजर ऑफ दर चॅम्पियनशिपह्णचा खिताब तेलंगाणा टायगर्सचा सी. विजय सिंग याला देण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अकोला फायटर्स व तेलंगाणा टायगर्सच्या प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमरावती विभागाचे सचिव अक्षय टेंभूर्णीकर, विशाल सुनारिवाल, ऋषिकेश टाकळकर, विक्रमसिंग चंदेल, शे. एजाज शे. इरफान, गुफरान शाह, इरफान रजा, मोनिंदर सिंग, पूजा रहाटे, आरती बुंदेले यांनी काम पाहिले.
मेजर ध्यानचंद बॉक्सिंग चषक अकोला फायटर्सकडे
By admin | Published: August 31, 2016 2:52 AM