लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकेकाळी ७0 टक्के व्यवसाय मुस्लिमांच्या ताब्यात होता. मात्र, एकाने केले तेच दुसर्याने चालविले, त्यात नवा बदल केला नसल्याने व्यावसाय बुडाला, असे प्रसंग टाळण्यासाठी काळानुरूप व्यावसायात बदल करा, जग तुमचे आहे, असा मोलाचा सल्ला मुंबई येथील उद्योजक सलाउद्दीन साहब यांनी दिला. रिफा चेंबर ऑफ कॉर्मस अँन्ड इंडस्ट्रिज संघटनेच्या शिबिरात ते बोलत होते. शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अकोल्यातील एका हॉटेलमध्ये शाखेचे उद्घाटन झाले.देशभरात मंदीची लाट असताना आपला व्यावसाय कसा टिकवावा आणि प्रगती कशी करावी, या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी अकोल्यात हे शिबिर घेतले गेले. शिबिराला रिफा चेंबर ऑफ कॉर्मस अँन्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुंबईतील उद्योजक अफजल बेग साहब, सलाउद्दीन साहब, जीएसटी अधिकारी अभिजित नागले, सनदी लेखापाल जय गुरूबानी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. प्रोजेक्टरवर शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या बदलाच्या माहितीसोबतचं व्यावसायिकांनी बदलले पाहिजे, असे जाहीर आवाहन येथे करण्यात आले. दरम्यान, काझी जमीर यांनी येथे व्यावसायिक दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन उपस्थितांना केले. त्यांनी यासाठी काही उदाहरणेही दिलीत. उद्योग-धंद्यात इतर समाजापेक्षा मुस्लीम समाज मोठय़ा प्रमाणात आहे. भंगार, फेब्रीकेशन, रेडीमेड, फ्रूट, मोटार- मोटारसायकल मॅकेनिक आदी अनेक उद्योगात मुस्लीम समुदाय दिसतो. या समाजाचा उद्योजक एकसंध नसल्याने तो पाहिजे तशी प्रगतीचे टप्पे गाठू शकलेला नाही. हे शल्य येथे निदर्शनास आणूण देण्यात आले. या शल्यावर बोट ठेवून आता नवीन संघटनेची निर्मिती सुरू झाली आहे. मुस्लीम व्यापारी-उद्योजकांना एकत्रित आणण्यासाठी आता जिल्हा स्तरावर शिबिर घेऊन जनजागृती करण्याचे प्रयोग सुरू आहेत. त्यातूनच शुक्रवारी रिफा चेंबर ऑफ कॉर्मस अँन्ड इंडस्ट्रिजचे उद्घाटन करण्यात आले. अकोल्यातील हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मो. अनिस मेमन, मोहम्मद उस्मान, मोहम्मद युनूस, शहजाद अन्वर यांनी परिश्रम घेतलेत.
काळानुरूप व्यवसायात बदल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:51 AM
एकेकाळी ७0 टक्के व्यवसाय मुस्लिमांच्या ताब्यात होता. मात्र, एकाने केले तेच दुसर्याने चालविले, त्यात नवा बदल केला नसल्याने व्यावसाय बुडाला, असे प्रसंग टाळण्यासाठी काळानुरूप व्यावसायात बदल करा, जग तुमचे आहे, असा मोलाचा सल्ला मुंबई येथील उद्योजक सलाउद्दीन साहब यांनी दिला.
ठळक मुद्देउद्योजक सलाउद्दीन यांनी दिला मोलाचा सल्लारिफा चेंबर ऑफ कॉर्मस अँन्ड इंडस्ट्रिजची शाखा अकोल्यात