वाडी अदमपर: तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर, जाफ्रापूर गावातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड-१९ची लस उपलब्ध करून देण्याची मागणी करीत वाडी अदमपूर ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश राठी यांनी दि. १३ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाटेत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गावाचे सरपंच रुपेश राठी यांनी गावातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती केल्याने येथे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. नागरिक लस घेण्यासाठी सरसावले असताना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच गावातील १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे सोयी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तेल्हारा तहसीलदारांना व गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
---------------------------------
इसापूर तेथे लसीकरण राबविण्यात यावे!
तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. लसीकरण केंद्र परिसरात गर्दी होणार नाही, नियमांचे पालन व्हावे, यासाठी गाव तेथे लसीकरण सुरू करण्याची मागणी होत आहे. इसापूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र दानापूर असून, वाडी अदमपूर येथे जाफ्रापूर, वाकोडी या ठिकाणचे नागरिक मोठ्याप्रमाणात येत असल्याने नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे इसापुर येथे लसीकरण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी सरपंच मिराताई बोदडे यांनी केली आहे.