शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणातील नऊ आरोपींवर मकोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:41 PM

जिल्हा पोलिस अधीक्षकांचा गुन्हेगारांना दणका

आशिष गावंडे / अकोला: एक कोटी रूपये खंडणी मागण्याच्या उद्देशातून अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणात सहभागी असलेल्या सराइत व अट्टल नऊ गुन्हेगारांविराेधात जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मकाेकाचे (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९)हत्यार उपसले आहे. बच्चन सिंह यांनी सादर केलेल्या मकाेकाच्या प्रस्तावावर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेकळे यांनी शुक्रवारी शिक्कामाेर्तब केले. पाेलिसांच्या भूमिकेमुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगळे (रा.चिवचिव बाजार), शरद पुंजाजी दाभाडे, किशोर पुंजाजी दाभाडे (दाेन्ही रा. कळंबेश्वर ता.जि.अकोला), फिरोज खान युसूफ खान रा. जुना आळशी प्लाॅटच्या बाजुला, आशिष अरविंद घनबहाद्दूर (रा. बोरगाव मंजु) सरफराज खान उर्फ राजा रा.कान्हेरी सरप,चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे (१९)रा.जेतवन नगर खदान, मनीष उर्फ मन्या गजानन गाेपनारायण (२१) रा.शिर्ला अंधारे, विवेक उर्फ दादु अंबादास वरोटे असे मकाेका दाखल केलेल्या आराेपीतांची नावे आहेत. आराेपींची गुन्हेगारी पार्श्वभूमि पाहता संघटीत गुन्हेगारी कृत्य केल्याने सदर गुन्हयात अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मकाेकाच्या कलम ३(१),३ (२), ३(४) अंतर्गत कारवाइ करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पाेलिस उपअधीक्षक सतिष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, ‘एलसीबी’मधील ‘पीएसआय’ आशिष शिंदे मकाेकाचा प्रस्ताव तयार केला. सन २०२२ नंतर मकाेकाचा हा पहिलाच प्रस्ताव असल्याची माहिती आहे. यादरम्यान, वाेरा अपहरण प्रकरणी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात उपराेक्त आराेपींविराेधात १४ मे २०२४ राेजी भादंवि कलम ३६४(अ)३६५,३४, सहकलम ३,२५ शस्त्र अधि. १९५९ चा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.  ‘आयजीं’नी केले शिक्कामाेर्तबशहरात संघटित गुन्हेगारीचा बिमाेड करण्याच्या उद्देशातून जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी अपहरण प्रकरणातील आराेपींविराेधात मकाेका प्रस्तावित केला. हा प्रस्ताव विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेकळे यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यांनी या प्रस्तावावर शिक्कामाेर्तब केले. ‘त्या’दिवशी काय घडले?चार जीन परिसरातून व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांचे १३ मे राेजी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपींनी अपहरण केले. वाेरा यांचा माेबाइल झटापटीत खाली पडल्यामुळे आरोपी वोरा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले नाहीत. पाेलिसांचा वाढता दबाव पाहता १५ मे राेजी रात्री आरोपींनी वोरा यांना ऑटोत बसवून घरी पाठवले. त्याच रात्री ‘एलसीबी’ प्रमुख पाेलिस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने वेगाने तपास चक्रे फिरवीत १६ मे राेजी पहाटेपर्यंत पाच अपहरणकर्त्यांना बेड्या ठाेकत या प्रकरणाचा पदार्फाश केला हाेता. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांविराेधात कठाेर कारवाइ केली जाइल, यात दुमत नसावे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास संबंधितांची हयगय केली जाणार नाही.- बच्चन सिंह जिल्हा पाेलिस अधीक्षक

टॅग्स :Akolaअकोला