माळराजुरा स्थळामध्ये असलेल्या विविध वन्यप्राणी हरीण, रोही, काळवीट, मोर इत्यादी प्राण्यांचा अधिवास आहे, तसेच याबाबत मनमुराद आनंद घेऊन त्यांना या परिसरात असलेल्या वन्य प्राणी, पक्षी यांचे जवळून निरिक्षण करण्याची व बघण्याची संधी उपलब्ध होईल. असे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना के.आर. यांनी केले आहे.
........................
नवोदयची निवड चाचणी परीक्षा ११ ऑगस्टला
अकोला : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०२१ ही ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १६ मे रोजी होणार होती; मात्र ती त्यावेळी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. अधिक माहितीसाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगाव (जहा.)येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
...........................
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासाठी समित्या कार्यान्वित करा
अकोला - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय व गावस्तरीय समित्या लवकरात लवकर कार्यरत कराव्या, तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्येसुद्धा अकस्मात भेटी देऊन कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.
यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.प्रीती कोगदे यांनी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा सादर केला तर समुपदेशक डी. एम. शिरसाट यांनी प्रास्ताविक केले.