अकोला : खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इन्कम टॅक्स चौकातील श्रीहरी हॉटेलचा मालक हरिप्रसाद केशरवाणी आणि त्याचा भाचा दीपक लखनलाल केशरवाणी या दोघांनी मुन्ना उर्फ इंद्रजित केशरवानी यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळले होते. ही घटना पाच डिसेंबर रोजी घडल्यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या मुन्ना केशरवाणी यांचा मंगळवारी पाचव्या दिवशी मृत्यू झाला. मुन्ना यांना जाळणारा त्यांचा मोठा भाउ फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तर आरोपीच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी फरार असून त्यांच्याविरुध्द खदान पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इन्कम टॅक्स चौकात व्यवसाय करणारे मुन्ना ऊर्फ इंद्रजित प्रसाद केशरवाणी (५०) यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार तसेच मृत्यूपुर्व बयानावरुन त्यांचा मोठा भाउ हरीप्रसाद केशरवानी याच्यासोबत जागेवरून वाद सुरु होता. याच वादातून मुन्ना याच्या अंगावर त्यांचा मोठा भाऊ हरिप्रसाद केशरवाणी आणि भाचा दीपक लखनलाल केशरवाणी या दोघांनी रॉकेल ओतून जाळल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या बयानात नमुद केले होते. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आग विझवून जखमीला उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना केशरवाणी हे ७२ टक्के जळाले होते. त्यांची प्रकृती दिवसें-दिवस खालावत जात असतांनाच मंगळवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खदान पोलिसांनी आता दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या व्यक्तीचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 5:42 PM
मृत्यूशी झुंज देत असलेल्या मुन्ना केशरवाणी यांचा मंगळवारी पाचव्या दिवशी मृत्यू झाला.
ठळक मुद्देभाउ हरीप्रसाद केशरवानी याच्यासोबत जागेवरून वाद सुरु होता.दोघांनी मुन्ना उर्फ इंद्रजित केशरवानी यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळले होते. मंगळवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.