शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पत्नीला जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 4:51 PM

पत्नीने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविणाºया पतीला तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला: पत्नीने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविणाºया पतीला तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.गोरक्षण रोडवरील कैलास नगरात राहणारा आरोपी प्रदीप किसनराव भुुंबरकर(३५) हा व्यसनी आहे. तो नेहमीच पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागायचा आणि त्रास द्यायचा. २४ मे २0१८ रोजी आरोपी प्रदीप भुंबरकर याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रदीपने पत्नी वर्षा भुंबरकर हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आणि घरातून पळून गेला. वर्षा भुंबरकर ही जळालेल्या अवस्थेमध्ये आरडाओरड करीत बाहेर आली. आजुबाजूच्या लोकांनी तिला तातडीने सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. खदान पोलिसांनी आरोपी प्रदीप भुंबरकर याच्याविरूद्ध भांदवि कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला. वर्षा ही गंभीररित्या भाजली होती. या प्रकरणात खदान पोलिसांनी तिची जबाब नोंदविला. जबाबामध्ये तिने पतीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले. उपचारादरम्यान वर्षा भुंबरकर हिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पती प्रदीप याच्याविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. यासोबतच आरोपीच्या सावत्र मुलीने सुद्धा आरोपीविरूद्ध साक्ष देत, माझ्या आईला वडीलांनी रॉकेल ओतून जाळल्याचे सांगितले. न्यायालयाने साक्ष व मृतक वर्षाचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने आरोपी प्रदीप भुंबरकर याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोलीस उपनिरीक्षक संगीता रंधे यांनी केला होता. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाLife Imprisonmentजन्मठेपMurderखूनCourtन्यायालय