लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : कमी श्रमात व बसल्या जागी पैसे कमावण्यासाठी अनेक गुन्हेगार आता मोबाईल, इंटरनेट याचा वापर करु लागले आहेत. इंटरनेटमुळे एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. ओटीपी
किंवा आधारकार्ड क्रमांक विचारुन बँकेतून पैसे परस्पर वळविण्याच्या या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यात काेराेना काळात ४१
गुन्हे दाखल झाले आहेत.
केवायसीच्या नावाने कॉल करुन गोपनीय माहिती विचारली जात असून त्यामुळे क्षणात बँक खात्यातील पैसा वळविला जात आहे. जिल्ह्यात सायबर पोलिसांकडे वेगवेगळ्या फसवणुकीबाबत २०१८ ते २०२१ (ऑगस्टपर्यंत) ४१ गुन्हे दाखल
झालेले आहेत. त्यातील ३७ गुन्हे निकाली काढण्यात आले असून ४ गुन्हे प्रलंबित आहेत. केवायसीसाठी आपल्या मोबाईलवर कुणी लिंक पाठविली असल्यास मोहात पडू नका, याद्वारे खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. सायबर गुन्हेगार कॉल किंवा
एसएमएस करुन लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत.
तक्रारी काढल्या निकाली
पोलीस दलाच्या सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आता जिल्ह्यात सायबर सेलकडे माैखिक व नव्याने आलेल्या तक्रारी शिल्लक आहेत. बहुतांश प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहेत. सायबर पोलिसांकडे सर्वाधिक तक्रारी या ऑनलाईन फ्रॉडच्या आलेल्या आहेत. त्यातील आरोपी हे खास करुन झारखंड, दिल्ली, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील असल्याचे आढळून आलेले आहेत.
सायबर क्राइम वाढताेय
२०१६ २९
२०१७ ४३
२०१८ ४४
२०१९ ४२
२०२० ४१