पारस : बाळापूर तालुक्यातील एकूण आठ गावांमध्ये दहापेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही गावे ‘रेड झोन’ म्हणून जाहीर केली आहेत. एकूण आठ गावांमध्ये मनारखेड गावाचा समावेश असून, येथील सरपंच डॉ. सुरज पाटील लोड यांनी गावची सीमा सील केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १० मेपासून सुरू असलेल्या संचारबंदीच्या शासकीय नियमांमध्ये बदल करण्यात आला असून, या संदर्भात मनारखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्र गावचा आढावा व गाव सीमा बंद करण्याच्या पाहणीसाठी बाळापूरचे तहसीलदार मुकुंद, गटविकास अधिकारी सिक्रे, तालुका विस्तार अधिकारी देशमुख यांनी मनारखेड गावला भेट दिली व काही महत्त्वाच्या सूचना सरपंच डॉ. सुरज पाटील यांना केल्या. यावेळी ग्रामसेवक सुधीर काळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील. पोलीसपाटील संगीता दिवनाले, शिवशंकर लोड, नितीन सुरुशे, विष्णू लोड, शिवलाल दिवनाले, कोतवाल ज्ञानेश्वर लोड, मुकल दिवनाले, ऋषी बिलेवार उपस्थित होते.
फोटो: