शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

खराब गव्हाच्या तपासासाठी 'वखार'चे व्यवस्थापक अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:32 PM

अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त झालेला गहू खराब असल्याच्या तक्रारीवरून वखार महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोल्यात भेट दिली.

अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त झालेला गहू खराब असल्याच्या तक्रारीवरून वखार महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोल्यात भेट दिली. अवघ्या १० मिनिटात त्यांनी वखार महामंडळाच्या गोदामातून काढता पाय घेतल्याने नेमकी कोणती पाहणी त्यांनी केली, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.भारतीय खाद्य निगमकडून (एफसीआय) अकोला येथील (सीडब्ल्यूसी) केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात धान्य साठा सुरू झाला. ६ मार्च २०१९ पर्यंत झालेल्या ७० हजार गव्हाच्या पोत्यांत मोठ्या प्रमाणात गहू खराब असल्याची तक्रार गोदाम व्यवस्थापकांनी एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या मुंबई, नागपूर येथील वरिष्ठांकडे केली. १५ मार्च रोजी एफसीआय मुंबई कार्यालयाने गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी.के. बिहारी यांनी तपासणीसाठी पाठवले. त्यांच्या अहवालात गोदामातील गहू एफएक्यू असल्याचे भासवून त्याची उचल करण्याचे पत्र एफसीआयने जिल्हाधिकाऱ्यांना १८ मार्च रोजी दिले. त्यानुसार उचल सुरू झाली; मात्र जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये खराब गव्हाचा पुरवठा झाल्याने मोठा गोंधळ उडाला. सोबतच जिल्ह्यातील दुकानदारांनीही खराब गहू दिला जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे केल्या. या प्रकाराने अडचणीत आलेल्या जिल्हा प्रशासनाने गव्हाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. त्यातच २ ते २५ एप्रिलदरम्यान वखारच्या गोदामातून दिल्या जाणाºया धान्याच्या पोत्यांचे वजन कमी असल्याचा प्रकारही उजेडात आला. या घोळाच्या परिस्थितीत सीडब्ल्यूसी मुंबईचे प्रादेशिक व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोला गोदामात भेट दिली. या दौºयात गोदामातील घोळाचा छडा लावण्याची अपेक्षा असताना अवघ्या १० मिनिटांतच त्यांनी भेट आटोपली. सोबतच गोदामातील माथाडी कामगारांना अवैध प्रवेशाच्या मुद्यांवरही त्यांनी काहीच न केल्याने त्यांचा दौरा केवळ औपचारिकता ठरल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.- गुणवत्ता तपासणीत पडणार पितळ उघडेजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गव्हाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. एफसीआयचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी.के. बिहारी यांनी अवघ्या दोन तासाच्या भेटीत गहू एफएक्यू असल्याचा अहवाल दिला. प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो, यावर आता एफसीआय, सीडब्ल्यूसीचे पितळ उघडे पडणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला