निवडणुकीची उत्सुकता लागली असून गावातील राजकीय नेत्यांमध्ये चचार्चा सुरू झाली आहे. गावभर दवंडी देणे सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे. गावातील नागरिकसुद्धा कामचोर नेत्यांच्या कामांमुळे जागृत झाले आहेत. जशी निवडणूक जवळ येते आहे. तसे ग्राम पंचायत सदस्य आपल्या वाॅर्डात थातूरमातूर काम करण्यासाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच संतापलेल्या नागरिकांच्या तोंडून चर्चासुद्धा ऐकायला मिळत आहे. प्रत्येक वाॅर्डातील गल्लीत घाण, कचरा साचला आहे. गावात नाल्यांमधील सांडपाणी तुंबून रस्त्यावर वाहत आहे. अनेक भागात रस्ते, पथदिव्यांचा अभाव आहे. यंदा विकास कामे झाले नाहीत; परंतु यंदा विकास कामांना प्राधान्य देऊ. असे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांकडून नागरिकांना आश्वासने दिली जात आहेत; परंतु कोणी किती भ्रष्टाचार केला, कोणी विरोध केला, कोणी स्वतःचा विकास केला. हे सर्व नागरिकांच्या लक्षात आहे. सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या सर्वधर्मसमभाव, कर्तव्यदक्ष असलेल्या सुशिक्षित अशा व्यक्तींना संधी दिल्यास, त्याला पाठबळ देऊ अशी चर्चा ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळत आहे. तसेच यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक सरपंच व सदस्य नव्या दमाचे हवेत. अशी चर्चा नागरिक करीत आहेत. २०२१ सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचे समजते. गावातील हेवे दावे असल्याने गावचा विकास रखडला आहे; मात्र गावचा पूर्णपणे विकास व्हावा. याकरिता जागृत जनता सरपंच पदासाठी नायक शोधत आहे.
कुरणखेड ग्रामपंचायत सरपंचपदासाठी अनेक जण इच्छुक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:13 AM