नितीन गव्हाळे अकोला: अकोला पूर्व मतदार संघामध्ये येणाऱ्या डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेमध्ये रॅम्पची व्यवस्था नसल्याने आणि व्हीलचेअर असूनही ती बिघडलेली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढण्याचा व उतरण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
अकोला पूर्व मतदार संघातील भारत विद्यालय डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जागृती विद्यालय दिवेकर प्राथमिक शाळा यासह उमरीतील जिल्हा परिषद हायस्कूल टिळक राष्ट्रीय शाळा या मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक मतदान करण्यासाठी येत आहेत परंतु त्यापैकी उमरी रोड जठार पेठेतील डॉ.हेडगेवार माध्यमिक शाळेमध्ये रॅम्पची व्यवस्था न केल्यामुळे जेष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून मतदानासाठी जावे लागत आहे तसेच या ठिकाणी व्हीलचेअर आहेत पण रॅम्पची व्यवस्था नसल्यामुळे व्हीलचेयर न्यावी तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढून आणि उतरून मतदानासाठी जावे लागत आहे याचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असून याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माझे वय वर्ष 83 असून माझ्या पायाचे ऑपरेशन झालेले आहे मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाने शेअरची व्यवस्था करायला हवी होती जेणेकरून मतदान करणे सोपे किल्ले असते परंतु या ठिकाणी व्हीलचेअर आहे पण रॅम्पच नसल्यामुळे व्हीलचेअर वर बसून जाता येत नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.-रामचंद्र भगवान रामचौरे, ज्येष्ठ नागरिक जवाहर नगर अकोला