तिवसा : मराठा घाटोळे पाटील समाज विकास मंडळ अकोलातर्फे तिवसा येथे सत्कार साेहळ्याचे आयाेजन केले हाेते. अध्यक्षस्थानी दिलीप नानोटे हाेते. यावेळी आमदार अमित झनक उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून नारायण बारड यांनी मंडळाच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
किसनराव लुले, डॉ. अशेक आगलावे, राजू पाटील, तिवसा, सहदेव नानोटे उजळेश्वर, दत्तात्रय काळे चिचखेड, रमेश बेटकर वाघा, चंद्रकांत नानोटे, हरिचंद्र नानोटे निंभारा, डॉ. सतीश महागावकर महान, अशाेक लुले, जगन्नाथ् वानखडे, महादेव लुले, चंद्रकांत इढोळे, सुरेश इढोळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दिलीप नानोटे, अशोक कोहर यांनी मार्गदर्शन केले. समाजाच्या उपक्रमासाठी आमदार अमित झनक यांनी पाच लाख रुपयांची मदत दिली. याप्रसंगी भाऊसाहेब कपले, नारायण बारड, रमेश बेटकर, प्रशांत बोथे, काळे, सुरेश गाढवे, दिलीप बोबडे, रावसाहेब रहाणे, श्रावण फाले, हरिचंद्र डांगे, मनीष सरोदे, विजय मोरे, प्रकाश शिंदे, चंद्रकांत अवचार, विजय पिंपळकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सरपंच गजानन लुले, पांडुरंग पाटील, बबनरव लुले यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन दिलीप बोबडे यांनी केले, आभार रावसाहेब रहाणे व डॉ. वैभव लुले यांनी मानले.