शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

 Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण आंदोलनाची अकोल्यात धग; जिल्हा बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:42 PM

अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे या आवाहनास अकोला शहरासह जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे.सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले.

अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनास अकोला शहरासह जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. तर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी टायर पेटवून वाहतुक अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. बहुतांश मार्गांवरील बसगाड्या सुरु असल्याचे दिसून आले.

बोरगाव मंजू येथे रास्ता- रोकोबोरगाव मंजू : सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडे दहा वाजता रस्त्यावर आंदोलन छेडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर शहरातील शाळा, महाविद्यालयातुन विद्यार्थी आपल्या घरी शाळेतुन परत गेल्याचे चित्र दिसून आले. अंदोलकांनी एक मराठा- लाख मराठा, काकासाहेब शिंदे अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही , अशा घोषणा दिल्या. सकाळी शाळा, महाविद्यालये उघडण्यात आली होती; परंतु दहा वाजता नंतर विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी लगबग दिसुन आली. तर बस थांब्यावरील हॉटेल दुकाने बंद होती. आंदोलनात अजय देशमुख, गजानन देशमुख, योगेश बोधडे, धिरज देशमुख , संजय देशमुख, संजय पगारे, सोपान सारसे, चेतन राऊत, श्रीकांत देशमुख, महेश देशमुख, प्रशांत राऊत, याच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर ठाणेदार विजय मगर पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके , अरुण मदनकर, प्रवीण वाकोडे, पोलीसांनी अंदोलकांना शांत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, पोलीसांनी शांततेचे आवाहन करून चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

टॅग्स :AkolaअकोलाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा