अकोला : संविधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर तो सामाजिक न्यायाचा एक भाग आहे. पण, मराठा आरक्षण हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले आरक्षण असल्याचं ओबीसी सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ओबीसी सेवासंघाच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्ताने रविवार ९ डिसेंबर रोजी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ दिलेल्या खास मुलाखतीत ओबीसी चळवळ, राजकीय षडयंत्र आणि इतर मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.प्रश्न : ओबीसीचा लढा किती वर्षांपासून सुरू आहे ?राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी २४ एप्रिल २००० रोजी बदलापूर, मुंबई येथे ओबीसी सेवा संघाची स्थापना झाली. मागील १८ वर्षांपासून सातत्याने ओबीसी वर्गाच्या विकासासाठी काही वेळी सरकारशी चर्चा करुन, कधी धरणे धरून, कधी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय परिषदा घेऊन कार्य केले आहे. ओबीसी सेवा संघाने २००१ ला ओबीसी वर्गाच्या जनगणनेसाठी मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केले होते. त्यानंतर २००८ साली भंडारा येथे देशातील पहिली जनगणना परिषद घेण्यात आली.
प्रश्न : मराठा आरक्षणासंदर्भात असमर्थता आहे का?संवीधानाच्या कसोटीवर कोणालाही आरक्षण मिळत असेल, तर ते सामाजिक न्यायाचा भाग आहे. पण, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयीन कसोटीवर करे उतरणार नाही. कारण, मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कोणत्या पार्श्वभूमीवर दिले आहे, याचं गणित जुळत नाही. मराठा समाजाची जनगणना झालेली नाही. अपूर्ण आकडेवारीमुळे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही.
प्रश्न : ओबीसीचा संघर्ष कशासाठी ?ओबीसी समाज विखूरलेला असून, अजूनही वैचारीक गुलामगीरीत जखळलेला आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मात ओबीसी असून, आपसात भांडणे हा या समाचाचा संघर्ष नाही. तर समाजाला एकत्रित आणण्याची गरज आहे. हाच मोठा संघर्ष ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून लढल्या जात आहे. कारण, हा समाज एकत्र आल्यास आणि सत्ता मिळवल्यास या लोकशाहीत बहुजनांचेच राज्य असेल.प्रश्न : ओबीसी सेवासंघात युवकांची काय भूमीका आहे ?ओबीसीला प्रबळ करायचं असेल, तर त्यात युवकांची मोठी भूमीका आहे. सामाजिक विषमता, बेरोजगारीत जखळलेल्या युवा वर्गाला जागृक करून त्यांच्यातून नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी सेवासंघ कार्यरत आहे. या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील युवकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. युवकांमधूनच ओबीसीचं पुढचं प्रभावी नेतृत्व उदयास येईल. त्यासाठी युवकांनी संघर्षासाठी पुढे येण्याची गरज आहे.