अकोला: मराठा सेवा संघाच्या वतीने मातृशक्तीचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षे त्रा मध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या विविध कक्षाच्या पदाधिकारीपदी नियुक्तया करण्यात आल्या. यातून समाज एकत्रीकरणासाठी मराठा सेवा संघासह इतर कक्षासह पुढाकार साधण्यात येणार आहे.
जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे मातृसत्ताक पध्दतीने राष्ट्रमाता जिजाऊ वंदना, पुजन करून कार्यक्रमाची सुवात करण्यात आली. तसेच संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार तर प्रमुख अतिथि गजानन फाटे, डॉ. सीमा तायड़े, डॉ रणजीत यांची विचारपिठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रुपाली नाकट यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सांगितले. वनिता गावंडेंनी जिजाऊ वंदना सादर केली. यावेळी इंदू देशमुख यांची जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती, अभिजीत मोरे यांची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ति झाल्या बद्दल पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ सिमा तायड़े, अर्चना देशमुख, इंदू देशमुख, अशोक पटोकार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन जयश्री भुईभार तर आभार अविनाश नाकट यांनी केले. कार्यक्रमाकरीता संदीप पाटील महल्ले, संतोष कुटे, संदीप निर्मळ, अतुल अंधारे, घनशाम दांदळे, दिलीप देशमुख यांनी पुढाकार घेतला.
यांची करण्यात आली नियुक्ती
यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद अध्यक्षपदी मयुर गोठकडे, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (माध्य) अध्यक्षपदी संजय इंगळे, सचिव भागवत टेकाडे, प्राथमिक अध्यक्ष देविदास अंधारे, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि कक्षाचे अध्यक्षपदी रामेश्वर वाघमारे, सचिव दिनेश बहाकार, दिनकरराव जवळकार विचारवंत कक्षाचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, सचिव दिपक पोहरे, राजर्षी शाहू महाराज शिक्षण परिषदाचे अध्यक्ष प्रशांत जानोळकर, सचिव ओमप्रकाश दाळू, व्यसनमुक्ती कक्षाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव बबनराव कानकिरड, जिजाऊ सृष्टी कक्षाचे अध्यक्ष विजयराव देशमुख, सचिव गजानन फाटे, जेष्ठ नागरीक कक्ष अध्यक्ष आत्माराम भुयार, सचिव आर.के. देशमुख, न्यायदान कक्षाचे अध्यक्ष अॅड. विनोद माहोरे, सचीव अॅड. संतोष गावंडे, जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद अध्यक्ष पुष्पराज गावंडे, सचिव सागर लोडम, घनश्याम दांदळे आदींच्या नियुक्ता करण्यात आल्या आहेत.
सामुहिक शिवांजली अर्पण
मराठा सेवा संघाचे माजी सदस्य स्मृतीशेष विनायकराव महल्ले, हिम्मतराव गावंडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. यावेळी त्यांना विनम्र शिवांजली अर्पण करण्यात आली.