संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. शासन अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षणद्वारा संपूर्ण महाराष्ट्रात १४ ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी सर्वच अमराठी शाळांमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा आदेश होता. या आदेशाची अंमलबजावणी करीत शाहबाबू विद्यालयात मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी संपूर्ण पंधरवड्यात मराठीत अनेक स्पर्धा व उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या कोरोना रोगाच्या संबंधित शासनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात आला. शाहबाबू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद इसहाक राही यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात मराठी वाचन स्पर्धा, हस्ताक्षर लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, मराठी घोषवाक्य स्पर्धा, मराठी चार्टस निर्मिती, संबंधित वर्गाच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वाकप्रचार व त्यांचे अर्थ यांचे संकलन करणे, संपूर्ण शाळा परिसरात मराठीत संवाद साधणे, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले. मुख्याध्यापक मो. असलम, पर्यवेक्षक मोहसीन खान, मराठी विषय शिक्षक सै. मेराज, मो. साकीब आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
फोटो: