बुलडाणा : महाविद्यालयाच्या ह्यनॅकह्ण तपासणीच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मराठी शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ७0 शाळांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार्या ३५ जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे ७0 शाळांचे मूल्यमापन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे केले जाणार आहे. गुणवत्तावाढीच्या दृष्टीने महाराष्ट्र स्कूल असेसमेंट व अँक्रिडेशन (एम-सॅक) स्थापन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. भौतिक व अन्य सेवा सुविधा आणि गुणवत्ता या निकषांवर महाविद्यालयांची तपासणी करून ह्यनॅकह्णचा दर्जा दिला जातो. नॅकचा ह्यएह्ण व ह्यए प्लसह्ण दर्जा मिळविणे प्रतिष्ठेचे असते. हे मानांकन मिळविण्यासाठी महाविद्यालयांत स्पर्धा असते. या स्पर्धेतून अप्रत्यक्षरीत्या गुणवत्ता वाढत असल्याचे निदशर्नास असल्याने याच धर्तीवर आता ह्यएम-सॅकह्णची स्थापना करून प्राथमिक शाळांची तपासणी केली जाणार आहे. राष्ट्रीयस्तरावर जाहीर करण्यात आलेल्या सिद्धी कार्यक्रमांतर्गत ह्यएम-सॅकह्णसाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ७0 शाळांची तपासणी होणार आहे.
मराठी शाळांचे होणार मूल्यमापन!
By admin | Published: February 25, 2016 1:34 AM