हिरपूर येथील रामराव मोतीराव वानखडे यांची मुलगी साक्षी हिचा विवाह अतुल प्रभाकर गुबरे रा. मानेवाडा नागपूर याचेशी काही वर्षांपूर्वी झाला. तेव्हापासून सासरकडील मंडळी मानसिक व शारीरिक छळ करीत असून, तुझ्या बापाने १० लाख रुपये कबूल केले होते. त्यापैकी तीन लाखांचे सोने केले. मला नवीन गाडी घ्यायची आहे. तुझ्या वडिलांकडून तू लवकरात लवकर ५ लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला भयंकर त्रास होणार आहे, अशी धमकी देऊन पती अतुल प्रभाकर गुबरे (३३), सासू कांता प्रभाकर गुबरे (६५), दीर अमोल प्रभाकर कुबरे (३०), वर्षा मोहन नळकांडे (३५), मोहन प्रभाकर नळकांडे (४०), महिमा मोहन नळकांडे (४०), वनिता मनोहर इंगोले (४०) यांनी साक्षी हिचा मानसिक व शारीरिक छळ कल्याची तक्रार साक्षी गुबरे व तिचे वडील रामराव वानखडे यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध कलम ४९८ (अ) २९४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सूरज मंगरुळकर करीत आहे
विवाहितेचा छळ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:19 AM