अश्विनी सुरेंद्र वानखडे (वय ३७, रा. तरोडा कसबा, ता. शेगाव) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्विनीचे लग्न दि. ८ जून २०१४ रोजी सुरेंद्र बाबूराव वानखडे (रा. तरोडा कसबा) यांच्या सोबत झाला होता. तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पती सुरेंद्र वानखडे यांनी लग्नानंतर चांगली वागणूक दिली होती. आता पती सुरेंद्र वानखडे (४०) सासरे बाबूराव वानखडे (५५), सासू शालूबाई वानखडे (५०), दीर राजेंद्र वानखडे (४२), जाऊ छाया वानखडे (४०), चुलत सासरे देवलाल वानखडे (४८, सर्व रा. तरोडा कसबा) हे माहेरून पैशांची मागणी करीत असून, शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. त्यामुळे अश्विनी दि . १७ फेब्रुवारी २०१७ पासून मोरगाव भाकरे येथे आई-वडिलांकडे राहत आहे. अश्विनीच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी सासरकडील मंडळींविरुद्ध भा.दं.वि.च्या ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार येन्नेवार व संतोष भोजने तपास करीत आहेत.
पैशासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:18 AM