शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका माजी आमदार संजय गावंडे यांनी केली आहे.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. शेतकऱ्यांना नगदी रक्कम देऊनच खरेदी करावी लागते. अशावेळी भाव वाढतील या आशेने पुढील हंगामाची तयारी व घरखर्च यासाठी शेतकरी मालाची साठवणूक करीत असतो. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती काही दिवसापासून बंद असून २२ तारखेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे दलाल गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. पुढील हंगामाची चिंता असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कमी भावात विकावा लागत आहे. शेतकरी आपला माल विकण्यासाठी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून असतो. तेथील अधिकाऱ्यांना बाजार समिती चालू ठेवण्यात कुठल्याही प्रकारचे स्वारस्य नसते. कारण शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा नगदीचा फायदा त्यांना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत असतात. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे माजी आमदार संजय गावंडे यांनी म्हटले आहे.