डाळींचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट घातली आहे. हा आदेश तातडीने अंमलात आणला गेला आहे. हे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, गिरणी मालक आणि आयातदारांसाठी लागू केले आहे. डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारने मूग वगळता इतर डाळींवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठवणुकीची मर्यादा घातली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या या शेतमाल स्टॉक लिमिटच्या विरोधात अकोला शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवार, ५ जुलैपासून बाजार समितीचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार बंद केले होते. त्यामुळे बाजार समितीचे दैनंदिन लाखोंचे व्यवहार खोळंबले होेते. या सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहे. पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरू होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता बंद मागे घेण्यात येत आहे. सोमवारपासून शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होणार आहे.
- चंंद्रशेखर खेडकर, अध्यक्ष, व्यापारी-अडतीया मंडळ