अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चना) चार हजार रुपये प्रतिक्ंिवटल हमीदर जाहीर केले.यावर राज्य शासन ४०० रुपये प्रतिक्ंिवटल बोनस देणार आहे; आता काढणी सुरू होताच बाजारात हमी दरापेक्षा ६०० रू पयाने दर कोसळले. शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने खासगी बाजारात शेतकºयांची लूट सुरू आहे.पश्चिम विदर्भात रब्बी हंगामात बिगर सिंचनाचा हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात ४ लाख २३ हजार ९२० हेक्टर १२४ टक्के हरभºयाची पेरणी झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ५० हजार हेक्टरने कमी असले, तरी प्रतिकूल परिस्थितीत शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली. शेतकºयांना पैशांची नितांत गरज असल्याने हरभरा विक्रीची घाई सुरू आहे; पण रब्बी हंगामातील हरभरा काढणीचा हंगामा सुरू होताच बाजारभाव कोसळले.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्या सरासरी प्रतिक्ंिवटल ३५०० ते ३,६०० रू पये प्रतिक्ंिवटल दर सुरू आहेत. तर कमी दर हे ३,३०० रू पये आहेत. पण प्रतवारी व आर्द्रतेचे (ओलावा) निकष बाजारातही लावले जात असल्याने ३ हजार रू पयांपेक्षाही कमी दराने हरभरा खरेदी सद्या सुरू आहे. म्हणजे हमीदरापेक्षा एक हजार रू पये कमी दर शेतकºयांना दिले जात आहेत.
या खरीप हंगामात सर्वच शेतमालाचे दर कमी आहेत.आता हरभरा पिकावर शेतकºयांची भीस्त असताना हरभºयाचे दरही कोसळेल आहेत.शासकीय खरेदी केंद्रही सुरू न झाल्याने शेतकºयांची लूट सुरू आहे.त्यामुळे हरभरा खरेदी करण्यासाठी तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे.मनोज तायडे,संयोजक,शेतकरी जागर मंच,अकोला.