अकोला : महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने दसऱ्याच्या मूहुर्तावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त लांबला आहे.भारतीय कापूस (सीसीआय)महामंडळाचा खरेदीचा निर्णय न झाल्याने ‘पणन’ला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे वृत्त आहे.सणासुदीच्या दिवसात पैशाची गरज असल्याने शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे .परंतु खासगी बाजारात कापसाचे दर घटले आहेत.राज्यात कापूस काढणी हंगाम सुरू होत असल्याच्या पृष्ठभूमीवर येत्या १७ आॅक्टोबरपर्यंत पणन महासंघाच्यावतीने राज्यात ५० शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होते. तर सीसीआय ६५ खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे वृत्त होते. पण सीसीआयने अद्याप खरेदीचा निर्णय न घेतल्याने दसºयाला कापूस खरेदीचा मुहूर्त लांगणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यात यावर्षी ३९ लाख हेक्टरपर्यंत कापूस पेरणी झाली असून, उत्पादन भरघोस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने १५ आॅक्टोबर रोजी राज्यात ६५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतल्याचे वृत्त होते. महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस पणन महासंघ ‘सीसीआय’चा उपअभिकर्ता असल्याने सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यानंतरच पणन महासंघ राज्यात ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे. या दोन्ही संस्थांमिळून राज्यात ११५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पण अद्याप निर्णय न झाल्याने शेतकºयांना हमीपेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे.
दसºयाच्या मुहूर्तावर शासकीय कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पंरतु सीसीआयने खरेदी सुरू केल्यानंतरच पणन खरेदी करेल. त्यामुळे सीसीआय खरेदी केव्हा सुरू करते ते बघावे लागेल.प्रसेनजीत पाटील, उपाध्यक्ष, पणन महासंघ, बुलडाणा.