अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी विक्रमी कापूस खरेदी केला असून, आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार कोटीचे चुकरे केले आहेत. यातील ५०० कोटी चुकारे अद्याप शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. पणनला २०० कोटी रुपये प्राप्त होत असून, लवकरच उर्वरित चुकारे शेतकºयांना देण्यात येणार आहेत.पणन महासंघाने यावर्षी ५४ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. अलीकडच्या पाच ते सात वर्षातील ही सर्वाधिक खरेदी आहे. यापोटी शेतकºयांना २,५०० कोटी रुपयांचे चुकरे अदा करायचे होते, यातील दोन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत; परंतु कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली असून, यात आणखी ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अगोदरच्या २१ दिवसांच्या टाळेबंदीमुळे पणन महासंघाला शेतकºयांचे चुकारे करणे शक्य झाले नाही; परंतु आता २०० कोटी रुपये बँकेत जमा होणार असून, ही रक्कम येत्या दोन दिवसात शेतकºयांना अदा करण्यात येणार आहे . ३०० कोटीही लवकरच शेतकºयांना देण्यात येणार आहेत . पणन महासंघाचा सध्यातरी कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाला नाही .कापूस खरेदी करण्यासाठी ग्रेडरमध्येही मतभिन्नता असून ,टाळेबंदी उठल्यानंतर कापूस खरेदीचा निर्णय घेण्यासंदर्भात पणन महासंघाची बैठक होणार आहे. राज्यातील काही एपीएमसीने शेतकºयांच्या कापसाची नोंदणी केली आहे .ही नोंदणी पणन महासंघासाठी करण्यात आली आहे .
कापूस उत्पादक शेतकºयांना लवकरच कार्य करण्यात येणार आह.े त्यासाठीचे २०० कोटी रुपये पणन महासंघाला प्राप्त होत आहेत. उर्वरित चुकारे लवकरच करण्यात येणार आहेत. कापूस खरेदीचा निर्णय झाला नाही , झाल्यास कळवण्यात येणार आहे .- अनंतराव देशमुख ,अध्यक्ष ,कापूस उत्पादक पणन महासंघ .