असे आहे फसवणूक प्रकरण
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत्यांनी नर्मदा सॉल्वेक्स कंपनीला विकलेल्या सोयाबीनचा १ कोटी ८७ लाख रुपयांचा चुकारा नर्मदाच्या संचालकांनी केला नाही़ त्यामुळे या प्रकरणाची तक्रार रामदास पेठ पाेलिसात केल्यानंतर पाेलिसांनी शिवप्रकाश रुहाटिया व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी लक्ष्मी ट्रेडर्सच्या जावेद कादरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आली आहे़
पणन संचालकाची नर्मदाला क्लीन चिट
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नर्मदा सॉल्वेक्सचा खरेदी करण्याचा परवाना रद्द करण्याचा अर्ज वजा आदेश राज्य पणन संचालनालयाकडे केला होता. याविरोधात नर्मदा सॉल्वेक्सचे शिवप्रसाद रुहाटिया यांनी पणन संचालकांकडे अपील केले होते. यावर पणन संचालक सतीश सोनी यांचेसमोर अडते, बाजार समितीचे प्रतिनिधी व नर्मदा सॉल्वेक्स यांची सुनावणी झाल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी पणन संचालकांनी नर्मदा सॉल्वेक्सला क्लीन चिट दिल्याची माहिती आहे़