सिंधी कॅम्प येथील ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. २०१६ मध्ये येथील युवतीचा विवाह रायपूर येथील नितेश अशोककुमार पंजवानी याच्यासोबत झाला होता. युवतीच्या आईवडिलांनी लग्नामध्ये २५ लाख रुपये खर्च केला होता. तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये कमी पैसे दिले, असे म्हणून पती मानसिक छळ करीत होता, तसेच सासरा अशोक कुमार खेमचंद पंजवानी घरगुती कारणांवरून, छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्रास देऊन शिवीगाळ करायचे. इतकेच नव्हे, तर सिगारेटचा धूरही तोंडावर उडवित असल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. असे असतानाही ३५ लाख रुपये दुकान सुरू करण्यासाठी व १५ लाख रुपये माल खरेदीसाठी माहेरहून आणण्याचा तगादा लावत असत व मानसिक छळ करीत, अशा तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरा, जेठ मनिष व दीर योगेश, नणंद रितु मनिष कुमार मेघानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, रायपूर येथील कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:19 AM