तेल्हारा : ऐरवी लग्न हे मंगलाष्टकातील तदैव लग्नम,वाजंत्री बहूगलबला न करणे असे पंचम म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही; परंतु याला फाटा देत प्रहार च्या युवा कार्यकर्त्यांने आपले लग्न साध्या व कोरोना लॉकडाउनची खबरदारी बाळगून फक्त राष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प, गुच्छ देऊन पार पाडला व आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.तेल्हारा तालुक्यातील राजेश पाटील खारोडे यांच्या मुलाचा आदर्श विवाह नामदार बच्चू कडू यांना अभिप्रेत प्रणालीनुसार अगदी साध्या पद्धतीने नवरी घरी कुठलेही मंगलाष्टके न घेता लॉकडाउनची खबरदारी घेऊन विवाह संपन्न केला. अमरावती जिल्ह्यातील बबनराव दादाराव टेकाडे यांची कन्या पल्लवी व तेल्हारा तालुक्यातील प्रहारचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील खारोडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुरज खारोडे यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. लग्नाला लागणारा सर्व खर्च कपात करून तो खर्च अपंग व गोरगरिबांसाठी खर्च करणार असल्याचे खारोडे यांनी सांगितले.
मंगलाष्टके नव्हे, राष्ट्रगीताच्या साक्षीने केला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:41 AM
राष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प, गुच्छ देऊन पार पाडला व आपली वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.
ठळक मुद्देराष्ट्रगीत गायन व एकमेकांना हारपुष्प देऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. पल्लवी व सुरज खारोडे यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला.