अकोला: विवाहितेने माहेरावरून ४ लाख रूपये न आणल्याच्या कारणावरून तिचा शारिरीक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी आकोट फैल पोलिसांनी बुधवारी पतीसह सासरच्या पाच लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. शिलोडा येथील महालक्ष्मी कॉलनीत राहणारी अरशिया परवीन हिने दिलेल्या तक्रारीनुसार २८ नोव्हेंबर २0१0 रोजी तिचा विवाह खामगाव येथील मिल्लत कॉलनीत राहणारे अँड. शेख अल्ताफ शेख यामीन याच्यासोबत झाला.सुरूवातीला पती व सासरच्या लोकांनी अरशियाला चांगली वागणूक दिली. अरशिया हिला एक मुलगा आहे. दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी अरशिया हिच्याकडे माहेरावरून कार खरेदी करण्यासाठी ४ लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावणे सुरू केले. परंतू अरशिया ही मागणी धुडकावत होती. त्यामुळे सासरच्यांनी तिचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. अरशिया हिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती शेख अलताफ शेख यामीन, सासरा शेख यामीन शेख शेखजी, सासू रजिया बी शेख यामीन, दीर शेख नईम शेख यामीन व शेख मोहसिन शेख यामीन यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४९८(अ)(३४) नुसार गुन्हा दाखल केला.
विवाहितेचा छळ, सासरच्या सहा जणांविरूद्ध गुन्हा
By admin | Published: July 03, 2014 1:30 AM