अकोला : हुंड्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री महिलेलच्या तक्रारीवरून पतीसह १0 जणांवर गुन्हा दाखल केला. अमानखाँ प्लॉटमध्ये राहणारी प्रीती विनोद रगडे (२१) हिने दिलेल्या तक्रारीनुसार औरंगाबाद येथे राहणार्या विनोद नामक युवकासोबत काही वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती विनोद रगडे, सासू-सासर व इतर ७ जण तिला हुंड्याची मागणी करू लागले. ही मागणी पूर्ण होत नसल्याने आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला आणि तिची फसवणूक केली. तिच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८, ४१८, ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.
विवाहितेचा छळ; १0 जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: September 12, 2014 1:16 AM