मृत व्यक्तीचे दहावे, बारावे व तेरावे भटजींना बोलावून उरकण्यात येत असले तरी अगदी जवळच्या नातेवाइकांशिवाय अन्य कोणालाही बोलावणे टाळले जात आहे. या सर्व प्रथा जिल्ह्यात ऑफलाईनच करण्यावर भर आहे.
सध्या केवळ एखादाच विधी ऑनलाईन
परदेशात नोकरीनिमित्त असलेल्या उभयतांना लग्नासाठी किंवा साखरपुड्यासाठी गावी येणे शक्य नाही. त्यामुळे हे सर्व या कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभागी होत आहेत. केवळ एखाद्याच वेळेस भटजींकडून ऑनलाईन करून घेतले जात आहे. यजमानांच्या घरी भटजींना बोलावून मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा, विवाह सोहळे उरकले जात आहेत. लांबचे नातेवाईकही ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन उभयता व यजमान मंडळींना शुभेच्छा देत आहेत.
पूजेला आले तरी मास्क
पूजेला बसणारे यजमान व पूजा सांगणारे भटजी मास्क परिधान करत आहेत.
मोजक्या लोकांमध्ये पूजा उरकण्यात येत आहे. नमस्कारासाठी येणारी मंडळीही मास्क परिधान करून येतात.
पूजेला बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या हातावर आधी सॅनिटायझर दिले जात आहे. नंतरच पूजेला सुरुवात होते.
काय म्हणतात विधी करणारे...
कोरोनामुळे मोजकेच कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यावेळी शासकीय नियमांचे पालनही करण्यात येत आहे. सर्व कार्यक्रम हे ऑफलाईन होत आहेत. क्वचित एखाद्या वेळेस व्यक्ती परदेशात असल्यास ऑनलाईनचा प्रसंग घडतो. आम्ही मास्क घालूनच पूजा सांगतो.
- पंडित रविकुमार शर्मा
विवाह, साखरपुडासारखे कार्यक्रम आता फार कमी होत आहेत. वास्तुशांती, गणेश पूजन किंवा श्री सत्यनारायण पूजेचे प्रमाणही अल्प आहे. मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधीही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत उरकला जात आहे.
- बंडू जोशी