अकोला, दि. ११- लक्झरी बसस्थानकालगतच्या मोर्णा नदीच्या पुलावरून विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. खदान परिसरातील महात्मा फुलेनगरात राहणारी विवाहिता रमा आठवले (२७) हिने मोर्णा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु नागरिकांच्या समयसुचकतेमुळे तिचे प्राण वाचले. विवाहितेने उडी घेतल्याचे दिसून आल्यावर परिसरातील काही नागरिकांनी नदी पात्रात जाऊन विवाहितेला बाहेर काढले. सुदैवाने नदी पात्रात पाणी कमी असल्याने, तिला वाचविण्यात यश आले. तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाण्यात बुडाल्याने विवाहिता बेशुद्ध झाली. विवाहितेला तीन मुले असल्याची माहिती आहे. विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. यासंदर्भात ठाणेदार अनिल जुमळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलेच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती दिली.
विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: January 12, 2017 2:17 AM