अकोला: विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परतवाडा येथील सासरच्या सात जणांविरुद्ध गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातील जगजीवनराम नगरात राहणारी सुजाता रवींद्र वानखडे (३१) हिच्या तक्रारीनुसार तिचा पाच ते सहा वर्षांपूर्वी परतवाडा येथील रवींद्र प्रल्हाद वानखडे (३९) याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सासरा प्रल्हाद बाळकृष्ण वानखडे, सासू सूर्यकांता, जेठ संजय, जेठाणी स्वाती, दीर राजेश, दिरानी रोशनी वानखडे यांनी माहेराहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पैसे न आणल्याने त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व घराबाहेर हाकलून लावले. सुजाताच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला.
विवाहितेचा छळ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
By admin | Published: August 21, 2015 1:12 AM