शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

‘सिकलसेल’ लपवून केलेला विवाह न्यायालयात रद्द

By admin | Published: June 20, 2017 4:54 AM

अकोला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिकलसेलसारखा गंभीर आजार असतानाही विवाहापूर्वी आजाराची माहिती नवर्‍या मुलापासून लपवून ठेवून त्याच्याशी विवाह झाल्यानंतर संसार थाटण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धुडकावून लावत हा विवाह रद्दबातल ठरविला आहे. विशेष म्हणजे मुलीला हा आजार विवाहापूर्वीपासूनच असल्याचे सिद्ध झाल्याने अकोला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.खामगाव येथील एका युवतीसोबत प्रदीप नामदेवराव अंभोरे यांचा विवाह २00९ मध्ये झाला होता. विवाहाच्या तीन महिन्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने विश्रांतीसाठी माहेरी खामगाव येथे पाठविले होते. तिच्या माहेरहून नवरा मुलगा प्रदीप अंभोरे यांना पत्नीची प्रकृती बिघडल्याचा निरोप देण्यात आला. लगेच विवाहितेला अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तिला सिकलसेल अनेमिया आजार असल्याचे स्पष्ट केले. आजार बरा होणारा नसल्याने विवाहितेच्या पतीने तिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून अकोला येथील कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायद्यानुसार याचिका दाखल केली होती. या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रदीप अंभोरे यांची याचिका फेटाळून विवाहितेच्या बाजूने निकाल दिला होता. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला प्रदीप अंभोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिल्यानंतर खंडपीठात सुनावणी झाली. वासंती ए. नाईक आणि स्वप्ना जोशी या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठात दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाल्यानंतर मुलीला सिकलसेल हा गंभीर आजार असल्याने आणि या आजाराविषयीची माहिती विवाहापूर्वी नवर्‍या मुलाला न दिल्याने त्याची फसवणूक झाली, असे सांगून घटस्फोटच नव्हे तर हा विवाह रद्द करण्याचे आदेश दिले.