---------------------------
लाॅकडाऊनमुळे शेतकरी त्रस्त !
बाळापूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाल्याला ग्राहकच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत.
-------------------------------
नांदखेड-खिरपुरी रस्त्याची दुरवस्था !
बाळापूर : नांदखेड ते खिरपुरी बु. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे- मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
----------------------
आठवडे बाजार बंद ; व्यावसायिकांना फटका
तेल्हारा : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथे शनिवारी भरणारा आठवडे बाजार ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द केला. या बाजारात परिसरातील अनेक व्यावसायिक आपली दुकाने मांडतात. बाजार रद्द झाल्याने त्यांना फटका बसला आहे.
-----------------------
जि. प. शाळेतील प्रसाधनगृहांची दुरवस्था
अकोला : जिल्ह्यातील अनेक गावातील जिल्हा परिषद शाळांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत.
---------------------------
तापमानात वाढ ; समस्या वाढल्या !
अकोला : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे अनेकांना डोकेदुखी, अंगदुखीसह नेत्रविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. यातील बहुतांश लक्षणे ही कोविडची असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
-------------------------------
उन्हाळी मक्याची लागवड
अकोला : जिल्ह्यात सरासरी ४० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी मका पिकाची लागवड होण्याचा अंदाज होता. यामध्ये वाढ झाली असून २७९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी मका पिकाची लागवड झाली आहे.
----------------------------------
नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडले !
अकोला : कोट्यवधी रुपये खर्चून शहरात नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील रस्ता तसेच सिव्हिल लाईन्स समोरील रस्त्यावर खड्डे पडले असून सिमेंट रस्त्यातील लोहा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे.
------------------------------
खरप बु. येथे वीजपुरवठा खंडित
अकोला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. येथे वीज तारांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही परिस्थिती जैसे थे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.