सलग तीन ते चार दिवस एकाच मास्कचा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एक मास्क आठ तासांपर्यंतच वापरणे केव्हाही योग्यच. कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर आवश्यक आहेे; पण एक मास्क मर्यादित कालावधीसाठीच परिधान करावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.
मास्कचा वापर करताना मास्कला वारंवार स्पर्श करणे टाळावे. एकदा वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी.
सॅनिटायझरपेक्षा साबण बरे
कोरोनापासून बचावासाठी बहुतांश लोक सॅनिटायझरचा वापर करत आहेत. मिनिटामिनिटाला हाताला सॅनिटायझर लावत असल्याने अनेकांची त्वचा कोरडी पडून खास सुटत आहे. सॅनिटायझरच्या अतिवापरापेक्षा आवश्यक असेल तेव्हाच साबणाने हात धुणे बरे. कुठल्याही गोष्टीचा अतिवापर केल्यास त्याचे दुष्परिणाम समोर येतातच. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर काही मिनिटांत करण्याऐवजी तास दोन तासांनी करावा. शक्य असल्यास साबणाने हात स्वच्छ धुवावे. शिवाय, मास्कचादेखील आठ तासांपेक्षा जास्त काळ उपयोग नसावा.
- डॉ. आनंद आशिया, त्वचारोगतज्ज्ञ, अकोला